top of page

ग्लोबल शेपर्स कम्युनिटीचे संस्थापक क्युरेटर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी माननीय महापौरांची भेट घेतली.

दावोसच्या वार्षिक सभेसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ह्या बिगरनफा संस्थेने ग्लोबल शेपर्स कम्युनिटी - ठाणे हब मे २०१९ मध्ये सुरू केले आहे. विद्याधर प्रभुदेसाई, जे लीडकॅप व्हेंचर्सचे सह-संस्थापक आहेत, त्यांनी फॉऊंडिंग क्युरेटर होण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ग्लोबल शेपर्स समुदाय, हे ३० वर्षापेक्षा कमी वयाच्या तरुणांचे असे नेटवर्क आहे, जे हवामान बदल, शिक्षण, रोजगार, समभाग आणि समावेश यासारख्या क्षेत्रात संवाद, कृती आणि बदल घडवतात. सध्या १६० देशांमध्ये, ४०० हुन अधिक हब्स, ८ हजाराहून अधिक ग्लोबल शेपर्स आणि १३०० पेक्षा जास्त माजी शेपर्स आहेत. ग्लोबल शेपर्स हा समुदाय महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नागपूरसह भारतातील ३५ शहरांमध्ये प्रस्थापित आहेत. प्रत्येक शहरात, स्थानिक प्रभाव निर्माण करण्यासाठी हे हब प्रकल्प स्वयं-प्रेरणेनेने आयोजित करतात. ठाणे हबमध्ये सध्या ६ सदस्यांचा समावेश असून पुढील वर्षी जूनपर्यंत हि संख्या २० सदस्यांपर्यंत नेण्याची योजना आहे.. Read More


bottom of page