
ठाण्यातील उद्योगपती विद्याधर प्रभुदेसाई यांची निवड क्लाईमेट रिअलिटी लीडरशीप कॉर्प्स प्रशिक्षणासाठी करण्यात आली होती. हे प्रशिक्षण १८ ते २६ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले होते. प्रथमच ऑनलाइन भरवण्यात आलेल्या ह्या उपक्रमात १३० देशांमधील १० हजाराहुन जास्त क्लाईमेट रिऍलिटी लीडर्सनी सहभाग घेतला. यामध्ये युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष आणि नोबेल पुरस्कार विजेते अल गोरे, हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनच्या कार्यकारी सचिव पेट्रिशिया एस्पीनोसा, ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे भूविज्ञान विभागाचे प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. रतन लाल, लॉस एंजलिस क्लीनटेक इनक्यूबेटरचे अध्यक्ष मॅट पीटरसन आणि हवामान बदल आणि विज्ञान विषययातील अनेक ख्यातनाम नेत्यांचा हे प्रशिक्षण देण्यात समावेश होता. समाजातील प्रत्येक स्तरावर तातडीने कृती करण्याची गरज निर्माण करून हवामान संकटाचे जागतिक निराकरण करणे हे क्लाईमेट रिअलिटी लीडरशीप कॉर्प्सचे ध्येय आहे. क्लायमेट रियलिटी लीडरशिप कॉर्प हे 30 हजाराहून अधिक शक्तीशाली कार्यकर्त्यांचे जागतिक नेटवर्क आहे, ज्यांना अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष गोरे यांनी वैयक्तिकरित्या प्रशिक्षिण दिले आहे ..Read More
Comments