एखाद्याला मूल होत नाही म्हणून कुणाला सामाजिक जाणीवेतून अनाथ मूल दत्तक घ्यायचं असतं. पण खरंच ही दत्तक विधानाची प्रक्रीया कशी असते? भारतात कोण घेऊ शकतं दत्तक मूल? याविषयी Adopt one संस्थेचे सहसंस्थापक विद्याधर प्रभूदेसाई यांनी माहिती दिली आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा..... भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय (NRI) आणि परदेशी नागरिक (Foreigner) भारतात एखादे मूल दत्तक घेऊ शकतात. परंतु केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने (CARA) तिघांसाठीही वेगवेगळे नियम केले आहेत.
एकल पालक (single parent) अविवाहित किंवा घटस्फोटित, किंवा जोडपे (couple) दोघेही मूल दत्तक घेऊ शकतात. जर एखादे जोडपे (couple) मूल दत्तक घेत असेल तर त्या जोडप्याच्या लग्नाला किमान 2 वर्षे पूर्ण झाली असावीत. जोडपे असल्यास, मूल दत्तक घेण्यासाठी दोन्ही पालकांची संमती आवश्यक आहे. दत्तक घेतलेल्या मुलाच्या आणि पालकांच्या वयात किमान 25 वर्षांचा फरक असावा. जर एखाद्या एकल महिलेला (Single Woman) मूल दत्तक घ्यायचे असेल, तर ती सहज मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते.
तसेच जर एखाद्या एकल पुरुषाला (Single Man) मूल दत्तक घ्यायचे असेल, तर त्याला फक्त मुलगाच दत्तक घेता येऊ शकतो. तसेच कोणतेही जोडपे (Couple) एक मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकतात. मूल दत्तक घेताना पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असणे आवश्यक आहे. तसेच मुलाला दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना आधीपासूनच कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार नसावा. संभाव्य दत्तक पालक कोणत्याही धर्माचे असू शकतात. वरील सर्व पात्रता असल्यास, बाल न्याय कायदा (Juvinile Justice Act), 2015 नुसार मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
Read full article
Comentarios